शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अबब, चंद्र दिसणार लाल रंगाचा

येत्या 31 जानेवारी रोजी चंद्र लाल रंगाचा असेल. पण याचवेळी खग्रास चंद्रग्रहण असा 20 वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योगही आहे. पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झालं तर लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांनी याला 'स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स' असं नाव दिलं आहे.
 
बहुतांश चंद्रग्रहणं ही खंडग्रास स्वरुपाची असतात. पण 31 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतात हे चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे. सकाळी 6.20 वाजता चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. तर 9.30 वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. खग्रास चंद्रग्रहण फक्त पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे. यावेळी सूर्याची किरणं पृथ्वीद्वारे अडवली गेल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल. पण त्या सावलीच्या बाजूला पडणाऱ्या किरणं संधीप्रकाशित होऊन चंद्रावर पडणार असल्याने पृथ्वीवरुन चंद्र लाल दिसणार आहे.