बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रायबरेली , मंगळवार, 16 जानेवारी 2018 (09:55 IST)

राहुल गांधी यांचा आरोप – भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने खोटे बोलणे

कॉंग्रेस पक्षाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. भाजपा सातत्याने खोटे बोलत असल्याचा आणि जनतेला केलेली आश्‍वासने पाळत नसल्याचा आरोप त्यांनी सलोन येथे झालेल्या सभेमध्ये केला.
 
“भाजपाचे नेते एकापाठोपाठ खोटे बोलत सुटले आहेत. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याबाबत किंवा शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याबाबत किंवा रस्त्यांच्या बांधकामांबाबत सातत्याने खोटे बोलले जात आहे.
 
2014 च्या निवडणूकीमध्ये भाजपाने युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मोदी यांनी त्याबाबत एक चकार शब्दही काढला नाही.’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली. भाजपाचे असत्य उघड करण्याचे आवाहन त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले.
 
या सभेनंतर राहुल गांधींच्या ताफ्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्हीबाजूंनी घोषणा युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपा आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करून वाद अधिक वाढू न देण्याची काळजी घ्यावी लागली. मेली येथे कॉंग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची आणि अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक शेखर सिंह यांच्याशी जोरदार बाचाबाची झाली.