शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (10:42 IST)

मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या प्रमाणपत्राचं नूतनीकरण

नोबेल विजेत्या संत मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी (एमओसी) या संस्थेची परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारची (एफसीआरए) नोंदणी केंद्र सरकारने गुरुवारी पुन्हा नियमित केली.
परदेशी देणगी स्वीकारण्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र आता 2026च्या अखेपर्यंत वैध असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
प्रतिकूल बाबींचे कारण देत मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या परदेशी देणगी नोंदणीचे नूतनीकरण करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नकार दिला होता
कोलकातास्थित 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' संस्थेबद्दलच्या माहितीनुसार संस्थेच्या 'एफसीआरए' प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यात आले असून ते आता 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध असेल.