शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (16:44 IST)

Vidhan Sabha Election 2022 Date: विधानसभेच्या निवडणुका तारखा जाहीर, निवडणूक14 फेब्रुवारी रोजी , तर मतमोजणी 10 मार्च रोजी

Vidhan Sabha Election 2022 Date: Vidhan Sabha Election Dates Announced
विधानसभा निवडणूक 2022 तारीख: निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करताना आयोगाने सांगितले की, पंजाबमधील सर्व 117 जागांवर मतदान होणार आहे. पंजाबमधील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पंजाबसह पाचही राज्यांमध्ये 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.
 
मुख्य निवडणूक आयुक्तांनी तारखांच्या घोषणेपूर्वी सांगितले की, कोरोनामुळे निवडणुका घेणे खूप आव्हानात्मक आहे, परंतु आयोगाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यावेळी पाच राज्यांत 18.34  कोटी मतदार मतदान करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी माहिती दिली की, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड-19 पॉझिटिव्ह व्यक्ती पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकतात. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही भौतिक रॅली, रोड शो, पदयात्रा, सायकल-बाइक रॅलीला परवानगी दिली जाणार नाही.