सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (08:43 IST)

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावरच्या राजकीय जाहिरातींवर निर्बंध

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियावरच्या राजकीय जाहिरातींवर निर्बंध येणार आहेत. फेसबुकने हे निर्बंध मान्य केलेत. मतदानाच्या ४८ तास आधी राजकीय जाहिरातबाजी करायला मनाई आहे. निवडणूक काळात फेक न्यूज आणि चुकीच्या राजकीय जाहिराती काढून टाकणार. २१ फेब्रुवारापासून फेसबूक प्री व्हेरिफीकेशन प्रक्रिया सुरू होणार. राजकीय जाहिरात देणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा देणे बंधनकारक आहे. जाहिरातींचे पैसे हे भारतीय चलनात द्यावे लागणार असल्याने परदेशी हस्तक्षेपाला आळा बसेल असा दावा फेसबूकने केला आहे.
 
ही नियमावली अमेरिका, इंग्लंड आणि ब्राझीलमध्ये सुरू आहे. निवडणुकीच्या ४८ तास अगोदर प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींवर कोणतीही नियमावली नसली तरी निवडणूक आयोग निर्देश काढू शकत नाही, का असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे.