सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2024 (10:32 IST)

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात वरासह सहा जणांचा मृत्यू झाला. गुंटकल्लूचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिव भाकर रेड्डी यांनी सांगितले की, अनंतपूर येथील सात जण लग्नाच्या खरेदीसाठी कारमधून हैदराबादला गेले होते. तेथून परतत असताना जिल्ह्यातील गूटीजवळील बच्चुपल्ली येथे अपघात झाला. 
 
रेड्डी यांनी सांगितले की, कारच्या चालकाला झोप लागली होती, त्यामुळे कार दुभाजकावर चढली आणि दुभाजक ओलांडल्यानंतर ट्रकला धडकली. या अपघातात कार चालक बचावला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. मृत सर्व नातेवाईक होते. फिरोज बाशा असे या वराचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. 
 
Edited by - Priya Dixit