बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (16:55 IST)

स्वाभिमानीची आत्मक्लेश यात्रा सुरु, सदाभाऊ खोत गैरहजर

sadabhau khot

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रा सुरु झाली आहे.  खासदार राजू शेट्टी यांनी फुले वाड्यात अभिवादन करुन या यात्रेला सुरुवात केली. कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत मात्र या यात्रेला उपस्थित नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई पायी चालत आत्मक्लेश यात्रा पूर्ण करणार आहेत. ही यात्रा नऊ दिवसात मुंबईत पोहोचणार आहे. “दीर्घ काळाच्या प्रवासात, जर काही वाटसरु भटकत असतील, तर त्यांच्यासाठी विचार न करता पुढे जाणं हेच शहाणपण आहे,” असं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली.