बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (08:06 IST)

सरसंघचालक मोहनजी भागवत गोवा दौऱयावर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे  गोवा दौऱयावर येत आहेत. नागेशी फोंडा येथे पुढील चार दिवस चालणाऱया संघ परिवाराच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर मातृशाखांचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.
 
गेल्या सप्टेंबर महिन्यात रायपूर छत्तीगड येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमधील विविध विषयांचा आढावा व पाठपुरावा या सन्मवय बैठकीत होणार असल्याचे अधिकृत वृत्त आहे. बैठकीत संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह अखिल भारतीय स्तरावरील पदाधिकारी तसेच विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भाजपा, विद्याभारती, भारतीय किसान संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय येत्या 7 जानेवारी रोजी पणजी येथे गोव्यातील स्वयंसेवकांना मोहनजी भागवत मार्गदर्शन करणार आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor