1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 मार्च 2025 (18:55 IST)

कोझिकोडमध्ये एका उंच इमारतीवरून पडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

child death
मंगळवारी रात्री पलाझीजवळील एका उंच इमारतीच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
इवान हैबान असे या मयत मुलाचे नाव असून तो रात्री 8 वाजेच्या सुमारास लँडमार्क वर्ल्ड अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये अ‍ॅबॅकस टॉवरच्या सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले नंतर त्याला कोझिकोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे मृतदेह मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.