जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये फूट ओव्हर ब्रिज कोसळल्याने अनेक जण जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. उधमपूर येथील चेनानी ब्लॉकमधील बैन गावातील बनी संगम येथे बैसाखी उत्सवादरम्यान फूटओव्हर ब्रिज कोसळला. या अपघातात अनेक भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू आहे.
बैसाखीनिमित्त येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर अचानक फूटओव्हर ब्रिज कोसळला. या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अचानक फूट ओव्हर ब्रिज कोसळल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. उधमपूरचे एसएसपी डॉ. विनोद यांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
उधमपूरमधील बेनी संगम येथे बैसाखी जत्रेदरम्यान देविकावरील फूटब्रिज अचानक कोसळला. बैसाखी जत्रेमुळे येथे मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या अपघातात 20 ते 25 भाविक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत आहे.
Edited By - Priya Dixit