शबरीमाला येथे चेंगराचेंगरी, किमान २५ जण जखमी
केरळातील शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान २५ जण जखमी झाले आहेत. अय्यप्पा स्वामींच्या सुवर्णालंकारांची मिरवणूक सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. गंभीर जखमींना पम्बा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भक्त हे बऱ्याच वेळापासून अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाची आस लावून उभे होते. काही लोकांनी रांग तोडली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. अय्यप्पा स्वामी मंदिरात उत्सव चार दिवसांचा उत्सव सुरू आहे. जेव्हा अय्यप्पा स्वामींचे सुवर्णालंकार आणले जात होते तेव्हा खूप गर्दी जमा झाली. त्यावेळी काही लोकांनी रांगा मोडल्यामुळे एकच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली.