गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (09:24 IST)

सत्तास्थापनेसाठी शरद पवार आज सोनिया गांधींची भेट घेणार

राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज अर्थात सोमवारी भेट होणार आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन सत्तास्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात रविवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.   
 
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे  भेटणार आहेत त्यावेळी त्यांच्या यासंदर्भात चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी पुन्हा राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल त्यानंतर पुढे काय करायचंय याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,” असे नवाब मलिक म्हणाले.