गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (10:52 IST)

दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

पुन्हा एकदा दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खालावल्याचे दिसून आले. जागतिक क्रमवारीत दिल्लीचा एअर क्वॉलिटी इन्डेक्स ५२७ पेक्षा अधिक होता. दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. यापाठोपाठ पाकिस्तानातील लाहोर, कराची आणि भारतातील कोलकाता आणि मुंबईचाही प्रदूषित शहरांमध्ये समावेश आहे. 
 
दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरतो. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे लोकांसाठी श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.