1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (10:17 IST)

देशद्रोहाच्या प्रकरणात अटक झालेल्या शरजील इमामला जामीन मंजूर

Sharjeel Imam arrested in treason case granted bail देशद्रोहाच्या प्रकरणात अटक झालेल्या शरजील इमामला जामीन मंजूरMarathi National News In Webdunia Marathi
अलिगढ मुस्लीम विद्यापीठात देशविरोधी भाषण दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या शरजील इमामला अलाहाबाद हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शरजील यांनी भाषण केलं होतं. ते भाषण देशविरोधी असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.
अलाहाबाद हायकोर्टाच्या जस्टीस सौमित्र दयाल यांच्या पीठानं या प्रकरणी सुनावणी करताना शरजील यांना जामीन मंजूर केला आहे.
बिहारच्या काको गावातील असलेल्या शरजील यांनी आयआयटी बॉम्बेमधून बीटेक आणि एमटेक केलं आहे. तसंच जेएनयूमधून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.