बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (21:53 IST)

सोमय्या यांचा अर्जुन खोतकर यांच्यावर नवा आरोप

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर नवा आरोप केला आहे.अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इमारतीसाठी १०० एकर शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या  झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित १०० एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा सुरू आहे. खोतकरांना मॉल तयार करायचा आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि बिल्डिंगसाठी ही जागा हवी आहे, असं सोमय्या म्हणाले.
 
याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, “सरकारने साखर कारखान्यासाठी जागा दिली होती. त्या जागेची किंमत ४०० कोटी आहे. सर्व मिळून २४० एकर जागा आहे. त्याची किंमत १ हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे. आयकर विभागालाही त्याची तक्रार केली आहे. आयकर विभागही बेनामी व्यवहाराचा तपास करणार आहे. मुळे आणि तपाडीया परिवार आणि सहआयुक्त नांगरे पाटील यांची पत्नी रुपाली यांचं नावही पुढे येत आहे. मुंबईच्या सहआयुक्तांना मी भेटलो होतो. या घोटाळ्याचा तपास मी सहआयुक्त होण्यापूर्वी बंद केला होता. काहीच घोटाळा नाही, असं या सहआयुक्ताने सांगितलं. एका सहआयुक्तांनी दुसऱ्या सहआयुक्ताला सर्टिफिकेट दिलं, असं ते म्हणाले”.