गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (12:21 IST)

शिवराजसिंह खोटे बोलले, ट्रोल झाले

मध्यप्रदेशातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम आणि गुळगुळीत आहेत, असा दावा शिवराजसिंहांनी अमेरिकेत केला. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवराजसिंहांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. शिवराजसिंह हे मध्य प्रदेशात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी शिवराज म्हणाले, “मी गेल्या 12 वर्षांपासून मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. पायाभूत सुविधांशिवाय कोणतंही राज्य पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी सर्वात आधी आम्ही रस्ते बनवले. ज्यावेळी मी अमेरिकेत विमानतळावर उतरलो आणि रस्त्याने आलो, तेव्हा मला वाटलं की मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकपेक्षा उत्तम आहेत”.

शिवराज यांचं वक्तव्य प्रचंड वेगानं व्हायरल झालं आणि लोकांनी हसा लेको स्टाईलमध्ये त्याची खिल्ली उडवली. शिवराज यांच्या वक्तव्यानंतर लोकांनी ट्विटरवर तऱ्हेऱ्हेचे फोटो टाकायला सुरुवात केली.