1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 20 डिसेंबर 2021 (11:51 IST)

जेवण गरम करुन दिलं नाही म्हणून डॉक्टर वहिनीवर झाडल्या गोळ्या, दिराने स्वत:ही केली आत्महत्या

Shocking! man commits suicide by shooting doctor sister in law धक्कादायक ! डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडून हत्या करून
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात रविवारी स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या डॉक्टर वहीनीची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर आरोपी व्यक्तीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
 
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूर्यकांत शर्मा  म्हणाले की, ही घटना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या हाटपिपल्या शहरात घडली. बीएमएचएस पदवीधारक रीना मालवीय (25) असे मयत महिलेचे नाव असून, ती शहरातील देवगड रोडवर दवाखाना चालवायची. त्यांनी सांगितले की, सकाळी आठच्या सुमारास रीनाचा मेहुणा विजय मालवीय दवाखान्यात पोहोचला आणि रीनावर पिस्तुलातून गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर लोकांनी रीनाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, नंतर आरोपी विजयने जवळच्या बागेत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून आरोपीचे पिस्तूल आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.