सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:51 IST)

'योगी सरकार आमचे फोन टॅप करत आहे' - अखिलेश यादव

योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत असा आरोप समाजवादी पार्टीचे अधयक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. केंद्रीय संस्थाच्या जोरावर विरोधकांना धमकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले आहेत.
अखिलेश यादव यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भाजपवर थेट आरोप करत मुख्यमंत्री आदित्यनाथ अनुपयोगी असल्याची टीका केली आहे.
 
ते म्हणाले, "आमचे फोन टॅप केले जात आहेत. योगी आदित्यनाथ स्वत: काही लोकांचे रेकॉर्डिंग ऐकतात. पत्रकारांनो तुम्हीही सावध राहा. भाजपला पराभवाची धास्ती आहे म्हणूनच आता दिल्लीहून नेते, त्यांचे मुख्यमंत्री, अध्यक्ष येतील."
 
सपाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय आणि इतर काही नेत्यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. भाजपला हारण्याची भीती आहे म्हणूनच अशी कारवाई केली जाते असंही ते म्हणाले आहेत.