धक्कादायक ! वडिलांनी रागावले म्हणून मुलाने गिळले 27 खिळे
आई वडील मुलांना त्यांच्या चांगल्यासाठीच रागावतात. मुलांनी देखील त्यांचे रागावणे मनावर घेऊ नये. पण ग्वाल्हेर शहरात एका अल्पवयीन तरुणानेजे कही केले ते धक्कादायकच आहे. त्याच्या अशा कृत्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला असता. वडिलांनी रागावले म्हणून या तरुणाला राग आला आणि त्याने रंगाच्या भरात येऊन एक दोन नाही तर तब्बल 27 खिळे गिळले. तरुणाच्या कुटुंबियांना तरुणाचे पोट दुखु लागल्यामुळे ही माहिती मिळाली. तरुणाचे अल्ट्रासाउंड केल्यावर तपासणी मध्ये त्याच्या पोटात खिळे असल्याची माहिती उघडकीस झाली. डॉक्टरांनी अडीच तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ते खिळे काढण्यात आले.
या 17 वर्षीय तरुणाला ग्वाल्हेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याला पोटदुखीचा त्रास होत होता. रुग्णालयातील डॉक्टर वीरेंद्र माहेश्वरी यांनी सांगितले की, प्रथम या तरुणाची अल्ट्रासाऊंड तपासणी करून त्यांना आश्चर्य वाटले. धनंजय (17) नावाच्या या तरुणाने 21 दिवसांपूर्वी खिळे गिळल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले.पोट दुखू लागल्याने वडिलांनी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अडीच तास चालली. सध्या मुलाची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने गिळलेल्या खिळ्यांमुळे तरुणाचे यकृत आणि किडनी खराब झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.