सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (18:00 IST)

धक्कादायक! नवरा काळा असल्याने पत्नीने जिवंत जाळले, पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

jail
नवरा काळा असल्याने तिने पतीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील संभल येथे घडली आहे. या प्रकरणी संभल जिल्हा न्यायालयाने आरोपी पत्नीला 25 हजार रुपयांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 
 
हे प्रकरण संभल जिल्ह्यातील कुधफतेहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिचैता काझी गावातील आहे. नवरा काळा असल्याने एका पत्नीने आपल्या पतीची पेट्रोल टाकून हत्या केली. 
प्रेमश्री असे या पत्नीचे नाव असून तिने पती सत्यवीरला त्याच्या काळा रंगामुळे सतत बोलायची त्याचा तिरस्कार करायची. एके दिवशी तिला राग आला आणि तिने नवरा झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवले. त्याला तातडीने आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. 

या प्रकरणात मयत सत्यवीरच्या भावाने हरवीर ने आपल्या वहिनी प्रेमश्रीच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली असून त्याने पोलिसांना सांगितले की घटनेच्या दिवशी तो वडिलांसोबत शेतात गेला होता आणि त्याचा भाऊ सत्यवीर हा घरात झोपला होता. हरवीरने भावाला शेतात चहा घेऊन यायला सांगितले. बऱ्याच वेळ झाला तरी भाऊ चहा घेऊन आला नाही म्हणून हरवीर त्याला बघायला घरी आला आणि त्याला घडलेले सर्व समजले. त्याने वाहिनी प्रेमश्रीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी प्रेमश्रीला अटक केली असून घटनेशी संबंधित सर्व साक्षीदार आणि पुरावे नायायालयात सादर केले. न्यायालयाने प्रेमश्रीला दोषी ठरवले आणि तिला 25 हजार रुपयांचा दंड आणि जन्मठेप सुनावली.   
 
Edited by - Priya Dixit