शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (12:56 IST)

गायकाचा 'लाइव्ह परफॉर्मन्स' दरम्यान 'स्टेज'वरून पडून मृत्यू

प्रसिद्ध मल्याळम गायक एडवा बशीर यांचे निधन झाले. लाइव्ह परफॉर्मन्स देताना ते स्टेजवरून कोसळले आणि जगाचा निरोप घेतला. शनिवारी बशीर केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील पाथीरपल्ली येथे लाइव्ह कॉन्सर्ट करत होते. यादरम्यान ते अचानक स्टेजवरून पडले आणि वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले .
 
ब्लू डायमंड ऑर्केस्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बशीर केरळमधील अलाप्पुझा येथे एका मैफिलीत सहभागी होण्यासाठी होते. यादरम्यान येसुदासचे 'माना हो तुम' गाणे म्हणत असताना बशीर अचानक स्टेजवरून खाली पडले. यानंतर त्यांना चेरथळा येथील खासगी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांची प्राण ज्योत मालवली.