पाच वर्षांपूर्वी महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी कोर्टाचा निर्णय, सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा
Odisha news : ओडिशातील कालाहंडी जिल्ह्यातील एका 55 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धर्मगडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश चंद्र प्रधान यांनी बुधवारी प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि पुराव्याच्या आधारे हा निर्णय दिला.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात शिक्षा झालेल्यांनी गुन्ह्याच्या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या अन्य तीन आरोपींना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले होते.तसेच ही घटना सप्टेंबर 2019 मध्ये घडली, जेव्हा पीडित भवानीपटना येथील तिच्या घरी जात होती. यावेळी महिलेच्या ओळखीच्या एकाने तिला मोटारसायकलवर लिफ्ट देऊ केली. पण, वाटेत या आरोपीने त्याच्या साथीदारांसह महिलेला रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडिओ बनवून त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. आता न्यायालयाने या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
Edited By- Dhanashri Naik