1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Sleeper bus catches fire on Yamuna Expressway in Greater Noida

ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. एका स्लीपर बसला आग लागली. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक मोठी बातमी येत आहे, जिथे एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. एका स्लीपर बसला आग लागली. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा बसमध्ये ३५ जण होते, त्यापैकी अनेक जण आगीत गंभीररित्या भाजले आहे. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. ही डबल-डेकर बस नोएडाहून आग्राकडे जात होती.
यमुना एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या एका पर्यटक बसला अचानक आग लागली. नोएडापासून सुमारे ३४ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेवर कार्गो विमानतळाजवळ ही आग लागली. जळणाऱ्या बसचा एक भयानक व्हिडिओ देखील समोर आला आहे. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ऐनवेळी बसमधून उडी मारली. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात! वाद मिटवण्यासाठी गेलेल्या वडिलांची लोखंडी सळीने वार करून हत्या