मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

स्मृती इराणी मैत्रीण एकतासोबत 14 किमी पायी चालत सिद्धिविनायक पोहचल्या

मुंबई- स्मृती इराणी सोमवारी रात्री आपल्या घराहून 14 किमी पायी चालत मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहचली. त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण आणि चित्रपट निर्माता एकता कपूर देखील होती. स्मृतीने अलीकडेच गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. 
 
एकता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आम्ही सिद्धीविनायकाला जात आहोत आणि ती नंग्या पायाने चालत आहे. 14 किमी चपला न घालता. स्मृतीवर विश्वास होत नाहीये. ही देवाची इच्छा आहे.. चला... 
 
एकता कपूरने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पायी चालून मंदिरात पोहचल्यावर घेतलेला आहे. एकताने 14 किमी पायी चालत गेल्यावर चेहऱ्यावर आलेला ग्लो असे कॅप्शनही दिले आहे. यावर स्मृतीने लिहिले देवाची इच्छा आहे. देव दयाळु आहेत.