मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (13:08 IST)

चांगली बातमी, या सॉफ्टवेअरने अवघ्या काही सेकंदात सापडेल कोरोना विषाणू

नवी दिल्ली : आयआयटी रुडकीच्या एका प्राध्यापकाने असे संशयित रुग्णाच्या एक्स रे स्कॅन चा वापर करून पाच सेकंदात कोविड 19 शोधू शकणारे सॉफ्टवेअर विकसित केल्याचा दावा केला आहे. या सॉफ्टवेअरच्या पेटंट साठी प्राध्यापकांनी अर्ज केले आहे आणि त्याचे पुनरवलोकन करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडे संपर्क साधला आहे. 
 
हे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी त्यांना 40 दिवस लागले. नागरी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक कमल जैन यांनी असा दावा केला आहे की सॉफ्टवेअरमुळे निव्वळ चाचणीची किंमत कमी होणार नाही तर आरोग्य व्यावसायिकांना विषाणूंचा धोका होण्याची शक्यताही कमी होईल. आतापर्यंत कोणत्याही वैद्यकीय संस्थेने कोणत्याही दाव्याची पुष्टी केलेली नाही.
 
जैन म्हणाले, कोविड19 न्युमोनिया आणि क्षयरोगाच्या रुग्णांच्या एक्स किरणांसह सुमारे 60000 एक्स रे स्कॅनचे विश्लेषण करून या तीन आजारांमध्ये छातीत रक्तसंचय वेगळे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटाबेस विकसित केला. अमेरिकेतील एनआयएच क्लिनिकल सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या छातीच्या एक्स रे च्या डेटाबेस चे विश्लेषण ही केले. 
 
ते म्हणाले, 'माझे विकसित सॉफ्टवेअर वापरून डॉक्टर लोकांच्या एक्स-किरणांची छायाचित्रे अपलोड करू शकतात. सॉफ्टवेअर मध्ये रुग्णाला न्युमोनियाची लक्षणे आहेत का याचीच तपासणी नव्हे तर कोविड19 किंवा इतर कोणत्याही जिवाणूंमुळे संसर्ग झाले असल्याची तीव्रता देखील मोजेल. '
 
ते म्हणाले की, हे सॉफ्टवेअर अचूक प्राथमिक तपासणी करण्यात मदत करू शकते आणि त्यानंतर या प्राणघातक विषाणूंची लागण झालेल्या लोकांची अधिक चौकशी आणि तपासणी केली जाऊ शकते.