शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (12:01 IST)

काही लोक काम न करता फक्त श्रेय घेतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त श्रेय घेणे ठाऊक आहे काम करणे नाही असा टोला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी लगावला आहे. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे कौतुक केले. जगभरात मनमोहनसिंग यांची ओळख ही त्यांच्या कामामुळे झाली. काही लोक काम करतात आणि मोठे होतात आणि काही लोक फक्त श्रेय घेतात असा टोला आपल्या भाषणात सोनिया यांनी लगावला.
 
मात्र मनमोहनसिंग हे आत्मस्तुती करणारे नेते नाहीत. दहा वर्षे त्यांनी भारताचे पंतप्रधानपद सांभाळले. आपल्या कामामुळे जगभरातून सन्मान मिळवला. आपल्या कामाचा जगापुढे आदर्श ठेवला असेही सोनिया यांनी म्हटले आहे. त्यांनी जेव्हा देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले आणि त्यानंतर ज्या धोरणांचा अवलंब केला त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती झाली असेही गांधींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
 
छत्तीसगडमध्ये मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. पाच वर्षांसाठी गांधी घराणे वगळून पक्षाचा अध्यक्ष करून दाखवा असे आव्हान मोदींनी दिले होते. या टीकेला उत्तर देताना सोनिया यांनी मनमोहनसिंग यांची स्तुती करत आणि मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.