शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (12:58 IST)

Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली,रुग्णालयात दाखल

sonia gandhi
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडली. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सौम्य ताप होता, त्यानंतर त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका डॉक्टरांनी सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
 
या पूर्वी मार्च मध्ये  देखील प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. .  एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले.
 
सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधी एकतेच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या. 
 



Edited by - Priya Dixit