संबंधित माहिती
- Angry girlfriend climbed 80 feet high tower टॉवरवर चढून प्रेयसीचा ड्रामा
- Delhi AIIMS Fire : दिल्ली एम्समध्ये आग, सर्व रुग्ण सुखरूप बाहेर
- Rahul Gandhi MP reinstated राहुल गांधींची खासदारकी बहाल, 136 दिवसांनी संसदेत जाणार
- Chandrayaan-3 Updates : चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर पाठवले पहिले चित्र
- Manipur still violence मणिपूरमध्ये 40 हजार सैनिक तैनात, तरीही हिंसाचार थांबेना. काय आहेत कारणं?
Accident due to speeding Mercedes भरधाव मर्सिडीजमुळे भीषण अपघात
Speeding Mercedes rams into several vehicles in Goa 3 killed पणजीकडे जात असताना गोव्यातील पोंडा तालुक्यातील बनस्तारी पुलावर भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज जीएलएस एसयूव्हीने तीन कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर मर्सिडीजचा चालक आणि इतरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीजमधील प्रवाशांना नंतर ताब्यात घेण्यात आले.
जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. वृत्तानुसार मृतांमध्ये एका पादचाऱ्याचाही समावेश आहे. या धडकेत दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले.
मर्डोल पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन गौडे म्हणाले, "पणजीकडे जाणारी मर्सिडीज समोरून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकींना धडकल्यानंतर चुकीच्या बाजूने गेली असावी." मर्सिडीजचा चालक दारूच्या नशेत होता का, याचा शोध पोलीस घेत असल्याचेही गौडे यांनी सांगितले.