शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (09:58 IST)

गणपती विसर्जनाच्या वेळी दगडफेक, 2 गटांमध्ये हिंसा

कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात बुधवारी रात्री दोन गटात दंगल झाली. येथील नागमंगला शहरातील गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीनंतर दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. या घटनेनंतर काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण गणपती मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढत असताना ते शहरातील एका दर्ग्याजवळून जात असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. यानंतर दोन्ही गटांमध्ये दंगल झाली.
 
पोलिसांनी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. तसेच हाय अलर्टवर आहे. या घटनेनंतर हिंदू समाजातील लोकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात निदर्शने करत दगडफेकीसाठी जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या घटनेचा निषेध केला आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.
 
कर्नाटक एसडीपीआय प्रमुख अब्दुल मजीद यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व डीजीपींना अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्याचे आणि कायदा सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्याचे आवाहन केले.