शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:25 IST)

नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी व दहावीच्या तीन विषयांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा असतानादेखील ही नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर या शैक्षणिक वर्षात जे नववीचे विद्यार्थी नापास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांची जून महिन्यात पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे.

शासनाने यापूर्वीच नववी दहावीसाठीही नैदानिक चाचण्या घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र याची अंमलबजावणी कधीपासून होईल व कोणकोणत्या विषयांसाठी ही चाचणी घेण्यात येईल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार जुलै महिन्यात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.