शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (18:27 IST)

फोनसाठी विद्यार्थिनीने विकले रक्त

लोकांच्या स्मार्टफोनच्या क्रेझच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. पण पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल. येथे एक 16 वर्षीय तरुणी आपले रक्त विकण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकत पोहोचली. तिला रक्त विकून स्वत:साठी स्मार्टफोन घ्यायचा होता. याची माहिती ब्लड बँकच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी चाइल्डलाइनला याबाबत माहिती दिली. यानंतर या मुलीचे काउंसलिंग करून तिला जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत तिच्या पालकांकडे पाठविण्यात आले.
 
मोबाईलची ऑनलाइन ऑर्डर दिली, पैसे द्यायला पैसे नव्हते
बालूरघाट जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या समुपदेशकांनी सांगितले की, मुलगी सकाळी दहाच्या सुमारास येथे आली होती. सुरुवातीला आम्हाला वाटले की ती रक्त गोळा करायला आली आहे, पण तिला रक्त विकायचे आहे असे सांगताच आम्हाला धक्काच बसला. मग आम्हाला वाटले की तिला तिच्या भावाच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे आहेत, म्हणून तिला रक्त विकायचे आहे. आम्ही काही वेळ तिच्याशी बोललो. तेव्हा तिने सांगितले की तिला स्मार्टफोन घ्यायचा आहे त्यामुळे तिला रक्त विकायचे आहे. मुलीने सांगितले की, तिने एका नातेवाईकाच्या फोनवरून स्वत:साठी ऑनलाइन मोबाइल मागवला आहे. आता भरण्यासाठी पैशांची गरज आहे. सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या तपन नावाच्या ठिकाणाहून ही तरुणी बालूरघाटात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात आणि आई गृहिणी आहे.
 
 मुलगी अल्पवयीन असल्याने रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चाइल्डलाइनला 1098 या क्रमांकावर माहिती दिली. यानंतर समुपदेशक तेथे पोहोचले आणि मुलीशी बोलले. रिटाच्या म्हणण्यानुसार, मुलीने सांगितले की तिने 9000 रुपयांचा फोन ऑर्डर केला आहे. या फोनची डिलिव्हरी गुरुवारी होणार आहे. ही मुलगी सोमवारी ट्युशनला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. तिने तिची सायकल बसस्थानकावर सोडली आणि तेथून बस पकडून बालूरघाट जिल्हा रुग्णालय गाठले. चाइल्डलाइन अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या जिल्हा बाल कल्याण समितीला माहिती दिली. त्यानंतर समितीने मुलीच्या पालकांशी संपर्क साधला.

Edited by : Smita Joshi