1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (15:11 IST)

दहावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून भरले जाणार

maharashatra board
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे परिक्षेचे अर्ज आजपासून ऑनलाईन मध्यातून भरता येतील. विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येईल. 
 
विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी भरल्या  जाणाऱ्या ऑनलाईन अर्जचा फॉर्म शाळेमार्फत भरणे आवश्यक असून नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षकांसह, नाव नोंदणी प्रमाणपत्रे प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधारणा, आयटीआय द्वारे क्रेडिट ट्रान्सफर करणारे विद्यार्थी, अधून -मधून विषयांसह परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज 11 ते 15 नोव्हेंबर पर्यंत करू शकतील. नियमित विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना सरल प्रणालीवर नोंदणी करावी. शाळांनी चलनाद्वारे 20 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत परीक्षा शुल्क बँकेत जमा करावा. तसेच माध्यमिक शाळांनी फी चलान सह 1 डिसेंबर रोजी विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या सादर करावे.  
 
इयत्ता बारावीचे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम, पुनर्परीक्षक, नावनोंदणी प्रमाणपत्रे प्राप्त झालेले विद्यार्थी, खाजगी आणि अपग्रेडेशन योजनेंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थी नियमित शुल्कासह 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत परीक्षेचा अर्ज भरू शकतील. 
 
Edited By- Priya Dixit