शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (08:19 IST)

अमरावती : ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार

accident
ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चिंचखेड फाट्यावर घडली. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दोन्ही युवकांची ओळख अद्याप पटली नसून ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
 
ट्रॅव्हल्स क्र.एम.पी.३०,पी.२९५ भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जात असतांना दोन युवक नवीन दुचाकीने माहुली जहागीरकडे येत असतांना चिंचखेड फाट्यानजीक ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. नागरिकांनी माहुली जहागीर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
 
माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरुळकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. ट्रॅव्हल्स च्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करीत आहेत.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor