रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2017 (17:56 IST)

सुब्रहमण्यम स्वामी यांना न्यायालयाने फटकारले

राम मंदिर प्रकरणी दररोज सुनावणी घ्यावी ही सुब्रहमण्यम स्वामी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सोबतच तातडीने सुनावणी घेण्यास न्यालयाने नकार दिला आहे.

राम मंदिर प्रकरणाच्या खटल्याचे तुम्ही याचिका कर्ते नसताना तुम्हाला याप्रकरणात एवढा रस का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांना विचारला. दररोज या प्रकरणावर सुनावणी करण्यास आमच्याकडे वेळ नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना फटकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर स्वामींनी नाराजी व्यक्ती केली.