शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (15:37 IST)

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ‘लाईव्ह’

नवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने 17 पानांची सुसाईड नोटही लिहून ठेवली असून त्यात पत्नी व मेव्हणा आपला मानसिक छळ करत असल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. गौरव असे त्या व्यक्तीचे नाव आहे. 
 
दिल्लीतील पश्चिम विहार या भागात गौरव पत्नी व आठ वर्षाच्या मुलाबरोबर राहत होता. 2009 मध्ये रितू नावाच्या तरुणीबरोबर त्याचे लग्न झाले. पण लग्नाच्या तीन महिन्यातच दोघांचे पटेनासे झाले. रितू व तिचा भाऊ गौरवला सतत धमक्या द्यायचे. त्यांनी त्याचा मानसिक छळ सुरू केला होता. रितू मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. ती गौरवला मुलासही भेटायला देत नव्हती. यामुळे तो निराश झाला होता. त्यातूनच गौरवने आयुष्य संपवण्याचा पण पत्नी व मेव्हण्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला.