रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (15:30 IST)

जिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर

रिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर देखील देणार आहे. अट अशी आहे की वर्षभरासाठी हा प्लान आपण घेतला तर वर्षभराचे पैसे कॅशबॅकमध्ये दिले जाऊ शकतात. या प्लानची किंमत १६९९ रूपये आहे. प्लानची मुदत १ वर्ष आहे. एका वर्षासाठी जिओ युझर्सला मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा मिळेल. या प्लानमध्ये युझर्सला दररोज दीड जीबी डाटा देण्यात येईल. यानुसार वर्षभर एकूण 547.5GB डाटा मिळेल.
 
जिओने यूजर्स १०० टक्के कॅशबॅक ऑफर दिली आहे. प्लानवरील कॅशबॅक ऑफर रिलायन्स डिजिटल कूपन्सच्या स्वरूपात मिळणार आहे. हे कूपन्स युझर्स माय जिओ अॅपच्या माध्यमातून वापरू शकतात. हे कूपन आपोआप युझर्सच्या अॅपमध्ये सेव्ह होईल. याचा उपयोग पुन्हा रिचार्जसाठी करू शकतात. कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणारे हे कूपन्स ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वापरावे लागतील. या कॅशबॅकचा वापर रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरवर देखील करू शकतात. पण यासाठी युझर्सला कमीत कमी ५ हजार रूपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे.