बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2017 (17:15 IST)

काँग्रेसच्या ६ खासदारांचे ५ दिवसांसाठी निलंबन

sumitra mahajan
लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. झिरो अवरमध्ये खासदारांनी पेपर फाडून, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या दिशेने भिरकावले. सभागृहामधील कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सर्व खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये जी गोगोई, के सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजीत रंजन, सुश्मिता देव आणि एमके राघवन यांची नावे आहेत. पाच दिवसांसाठी या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
 
लोकसभेत भाजपा खासदारांनी बोफोर्सचा मुद्दा उपस्थित केला होता. बोफोर्स प्रकरणी 2005 नंतरची सीबीआय तपासणी करण्यात यावी अशी मागणी भाजपा खासदारांनी यावेळी केली. यावर काँग्रेस खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.