मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (15:05 IST)

ताजमहाल, आग्रा किल्ला आजपासून खुले होणार

कोरोनामुळे गेल्या 17 मार्चपासून बंद असलेल्या ताजमहाल आणि आग्रा किल्ला  पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अधिकार्‍यांनी ही दोन्ही स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. यावेळी कोरोनाच्या नियमावलींचे पालन करावे लागेल.

17 व्या दशकानंतर पहिल्यांदाच ताजमहाल 188 दिवस बंद होते. इतिहासकार राजकिशोर राजे यांच्यामते, ताजमहालची निर्मिती 1632 ते 1648 दरम्यान झाली. आतापर्यंत तीनवेळा ताज बंद करण्यात आले. पहिल्यांदा  1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान ताजमहाल 15 दिवस बंद होते.