रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (09:36 IST)

तामिळनाडू : फटाक्यांच्या दुकानाला आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू

कल्लाकुरिची (तामिळनाडू). तमिळनाडूचा कल्लाकुरीची  जिल्ह्यातील शंकरापुरम क्षेत्रात एका फटाक्यांच्या दुकानाला आग लागली आणि या अग्निकांडात 5 जणांचा होरपळून अंत झाला. या अपघातात अनेक भाजले आहे, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा वृत्त लिहेपर्यंत फटाक्यांच्या दुकानाला आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही.
 
प्राथमिक वृत्तानुसार, दुकानासमोर उभी असलेली दुचाकीही मोठ्या प्रमाणात आगीमुळे जळून खाक झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि आपत्कालीन वॉर्डात उपचार घेत असलेल्या जखमींना 1 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
 
यावर्षी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 जण जखमी झाले असून त्यातील काही जण गंभीर आहेत. ही घटना डेहणे गावात सकाळी अकराच्या सुमारास घडली असून स्फोटानंतर आग लागली. हा परिसर मुंबईपासून 125 किमी अंतरावर आहे