मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 20 मार्च 2022 (12:34 IST)

फुटबॉल सामन्या दरम्यान भीषण अपघात, 200 हून अधिक जखमी

केरळमधील मलप्पुरममध्ये शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातात 200 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे, तर सुमारे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हा अपघात मलप्पुरम, पूंगोड येथील फुटबॉल मैदानावर झाला, जिथे सामन्यादरम्यान तात्पुरती प्रेक्षक गॅलरी ठप्प झाली. अपघात झाला तेव्हा सामना पाहण्यासाठी गॅलरीत 2 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.

रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. दोन स्थानिक संघांमधील अंतिम सामना पाहण्यासाठी लोक आले होते.गॅलरी पूर्ण भरून गेल्यानंतरही आयोजकांनी प्रेक्षकांची ये-जा थांबवली नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली, असा स्थानिकांचा आरोप आहे.