1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 20 मार्च 2022 (10:31 IST)

आपण लवकरच द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असू - राहुल गांधी

भारत लवकरच 'द्वेष आणि राग' या क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे, असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी  केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
 
त्यांनी 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट'चा हवाला दिला, ज्यामध्ये भारत 136 व्या क्रमांकावर आहे.
संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी  जगातील आनंदी देशांची यादी जाहीर केली. याचा आधार घेत राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, "भूकेच्या यादीत 101 वा, स्वातंत्र्य यादीत 119 वा आणि आनंदाच्या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. परंतु, आम्ही लवकरच द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असू शकतो."
 
आनंदाचा निर्देशांक मोजण्यासाठी त्या देशातील लोकांचे वैयक्तिक पातळीवरील समाधान, त्या देशातील लोकांचं चांगलं राहणीमान, देशाचा जीडीपी आणि त्या देशातील आयुर्मानाचा विचार केला जातो. या सर्व गोष्टींचे मुल्यमापन करून तो देश किती आनंदी आहे हे ठरवले जाते. जगातील दीडशे देशांचे या सर्व गोष्टींच्या आधारे मुल्यमापन केले जाते आणि त्यामधून देशांना क्रमांत दिले जातात. यंदा 146 देशांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये भारत 136 व्या स्थानी आहे.