शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (14:06 IST)

Bahraich Violence: बहराईच हिंसाचारात रुग्णलयात आणि शोरूममध्ये जाळपोळ आणि तोडफोड, अनेक दुकाने आणि घरे जाळली

Bahraich Violence
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या गोंधळाने मोठे रूप धारण केले आहे. बहराइचमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा एकदा जाळपोळ आणि तोडफोड झाली. अनेक दुकाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली. बाईक शोरूम आणि हॉस्पिटलला आग लागली आहे. वाहने जाळण्यात आली आहेत. या जाळपोळ मध्ये रुग्णालयातील औषधें जाळून खाक झाली आहे. 

ग्रामीण भागात देखील हिंसाचार उसळला आहे. चांदपैय्या आणि कबाडियापुरवा गावातही जाळपोळ झाली. अनेक घरे जळून खाक झाली आहेत. वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या प्रकरणी किमान 30 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनास्थळी तैनात आहे. 

तरुणाच्या मृत्यूमुळे हिंसाचार उसळला असून लोक निर्दशने करत आहे. कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. कुटुंबीय कठोर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.
 
सोमवारी सकाळी तरुणाच्या हत्येनंतर समाजातील लोक संतप्त झाले. हातात लाठ्या-काठ्या घेऊन जमाव रस्त्यावर उतरला. दुचाकी शोरूम आणि हॉस्पिटलमध्ये जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. रुग्णालयाशिवाय दुकाने आणि वाहनेही जाळण्यात आली आहेत.

यूपीचे मुख्यमंत्री योगी यांनी दंगलखोरांशी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ताज्या परिस्थितीचा अहवाल मागवला. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सीएम योगी यांनी हत्येतील आरोपींना लवकर अटक करण्यास सांगितले आहे. 
Edited By - Priya Dixit