1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जून 2024 (14:48 IST)

पीएम मोदी आणि सीएम योगी यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

बालिया जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अपशब्द आणि धमकी देणारा विडीपो समोर आल्यानंतर सोमवारी आरोपी तरुणाला अटक केली. 
 
पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली की, शहर क्षेत्राचे पोलीस क्षेत्राधिकारी गौरव कुमार शर्मा ने सांगितले की, सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना अपशब्द बोलत धमकी देत होता. 
 
त्यांनी सांगितले की, पोलीस चौकशीमध्ये माहिती पडले की, हा व्हिडीओ तीन ते चार वर्ष जुना आहे. सीओ ने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात बालिया शहर कोतवाली क्षेत्राच्या राजेंद्र नगर निवासी अकबर अली याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.