शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (19:33 IST)

रेल्वेने केले हे मोठे बदल; हे काम केल्यास दंड होऊ शकतो

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन नियम बनवते. आता रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार. आपण रेल्वेने प्रवास करताना मोबाईलवर गाणे ऐकत असाल, ग्रुपमध्ये बसून मोठ्या आवाजात बोलत असाल, विनाकारण दिवे चालू बंद केल्यास आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. 

प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद झाल्यास त्यासाठी दंडाची तरतूद आहे. अलीकडे रेल्वेच्या प्रवासात काही प्रवासी मोठ्याने गाणे ऐकण्याचा तक्रारी आल्यास त्याची तक्रार आता ट्रेनमध्येच केली जाऊ शकेल. रेल्वेच्या नियमानुसार, आपल्या सीट, डब्यात किंवा कोच मध्ये कोणताही प्रवासी आता मोठ्या आवाजात गाणे ऐकू ,तसेच मोठ्या आवाजाने बोलू शकत नाही. त्याची तक्रार आता इतर प्रवाशी टीटीई किंवा आरपीएफच्या जवानांकडे केल्यास त्या प्रवाशावर त्वरित कारवाई केली जाईल. आता प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास इतर प्रवाशांकडून होणार नाही. नियम मोडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे.