शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (18:38 IST)

350 फूटाच्या बोरलवेलच्या खड्ड्यात पडला मुलगा

रामटेकहून 20 किमी अंतरावर शिवनी या गावात दुपारी एक धक्कादायक घटना घडली ज्यात खेळता खेळता तीन वर्षाचा एक मुलगा 350 फूटाच्या बोरवेलच्या खड्ड्यात पडला. सुदैवाने तो वाचला हे ऐकून ती म्हणं आठवते... जाको राखे साइयां, मार सके न कोय...
 
मिळालेल्या माहितीनुसार येथील एका शेतात काठयावाडींनी डेरा टाकलेला आहे. जवळच 350 फूट खोल एक बोरवेल आहे. तीन वर्षाचा हा मुलगा इतर मुलांसोबत खेळत असताना खड्डयात पडला. त्याचे पालक आणि नातेवाईकांनी धाव घेतली आणि बघता-बघता बातमी गावात पसरली तर ग्राम रक्षक दलाचे लोकं घटनास्थळी पोहचले. मुलाला आवाज देत एक दोर सोडण्यात आला. मुलगा खड्ड्यात 20 फुटावर अडकला होता. आई-वडीलांचा आवाज ऐकून त्याने दोर घट्ट पकडला आणि त्याला वर ओढण्यात आले.
 
बाहेर आल्यावर शरीरावर जखम नसल्याची बघून सर्वांच्या जीवात जीव आला.
फोटो: प्रतीकात्मक