सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (12:01 IST)

निर्णय : दिल्ली उच्च न्यायालयाने सुशांतवर बनलेल्या चित्रपटावरील बंदीची याचिका फेटाळली

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यावर प्रस्तावित, बनविलेले किंवा तयार केलेले चित्रपट थांबविण्यास नकार दिला आहे आणि अभिनेत्याच्या वडिलांची याचिका फेटाळली आहे.वस्तुतः सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत अभिनेत्याच्या जीवनावर आधारित विविध प्रस्तावित चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी बॉलीवूड चित्रपटाच्या ‘न्याय: द जस्टिस’ च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी आरोप केला होता की या या चित्रपटाद्वारे दिवंगत मुलाची प्रतिमा खराब केली जात आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्ण किशोर सिंग यांनी आपल्या मुलाचे नाव किंवा तत्सम पात्र चित्रपटात वापरण्यास बंदी मागितलीहोती. याचिकेत सुशांतच्या जीवनावरील आगामी किंवा प्रस्तावित चित्रपटांचा उल्लेखहीआहे. महत्त्वाचे म्हणजे की  सुशांतसिंगराजपूत यांनी 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.