गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (11:52 IST)

कानपूर मध्ये भावाने अत्ता भद्रा आहे म्हणत राखी बांधून घेतली नाही, बहिणीने घेतला गळफास

suicide
उत्तर प्रदेश मधील कानपुर मध्ये एक दुखद घटना घडली आहे. भावाने राखी बांधून घेतली नाही म्हणून बहिणी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला आहे. आपला भाऊ राखी बांधून घेण्यास तयार नाही म्हणून बहिणीने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाऊ बहिणीला म्हणाला की, अत्ता भद्रा आहे. व हे सांगून त्याने राखी बांधण्यास नकार दिला. व घरातून बाहेर निघून गेला. यामुळे दुखी झालेल्या बहिणीने आत्महत्या केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशमधील कानपुरच्या घाटमपुर मधील साढ क्षेत्राच्या बैजूपुर गावातील आहे. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठविला. तसेच पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

Edited By- Dhanashri Naik