गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (11:42 IST)

लग्नासाठी निघालेली कार नदीत कोसळून नवरदेवांसह 9 ठार

लग्नासाठी निघालेली वरात मधील नवरदेवाची कार कोसळून नवरदेवांसह 9 जण ठार झाल्याची दुर्देवी घटना राजस्थानच्या कोटा येथे घडली आहे. हा अपघात बारावडा हून उज्जैन जात असताना नयापूर पुलावरून चंबल नदीत कार कोसळून झाला.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरु केले, मात्र कोणालाही वाचविण्यात यश आले नाही.  
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी वरात चौथ बारवाडा ते उज्जैनला जाण्यासाठी निघाली होती. कारमध्ये नवरदेवासह 9 जण होते. यासोबतच वराड्यानी भरलेली बसही चालली होती. एसपी केसर सिंह शेखावत यांनी सांगितले की, बसपुढे निघाली आणि नवरदेवाची कार वाट चुकली. यादरम्यान कार नयापुरा चंबळ नदीच्या छोट्या पुलावरून जात होती. त्यानंतर कारीचा नियंत्रण गेला आणि कार पुलावरून खाली नदीत कोसळून पडली.
 
पोलिसांनी सांगितले की, अविनाश नावाचा नवरदेवही गाडीत बसला होता. ही गाडी उज्जैनला जात होती. ज्यामध्ये चौथ बरवाडा आणि जयपूरचे काही लोक सहभागी होते. मात्र, पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी गोंधळ उडाला. अपघाताची माहिती कोणीही ऐकून तात्काळ कारमधील प्रवाशांच्या मदतीला धावून आले.
 
अपघाताची माहिती शहरात आगीसारखी पसरली. अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला. 
 
मृतांच्या आश्रितांनीमदतीची मागणी केली. या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे ते गरीब कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांना  अंत्यसंस्कारात खूप त्रास होणार असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत त्यांनी शवागारात पोहोचलेल्या जिल्हाधिकारी हरिमोहन मीना, आयजी रविदत्त गौर यांच्याकडे नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.