चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 12 वर्षे घरात डांबून ठेवले
कर्नाटकाच्या म्हेसुर जिल्ह्यात हिरेगे गावात एका व्यक्तीने चारित्र्य संशयावरून पत्नीला तब्बल 12 वर्षे घरात डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घरावर छापा टाकत महिलेची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून सन्नालैया असे त्याचे नाव आहे तर त्याची पत्नी सुमाला पोलिसांनी सोडवले आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पतीला आपल्या पत्नीवर दाट संशय होता. त्याने लग्नाच्या आठ दिवसानंतर आपल्या पत्नीला घराच्या एका खोलीत डाम्बवून ठेवलं तिला खोलीच्या बाहेर जाण्याची परवानगी देखील दिली नाही तर तिला घराबाहेरील शौचालयला वापरण्यास देखील मनाई होती.
त्याने खोलीतच एक बादली ठेवली होती. आरोपीचे या पूर्वी दोन लग्न झाले असून त्याचा व्यवहाराला कंटाळून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या. सुमाशी हे त्याचे तिसरे लग्न आहे. आरोपी सुमाचा छळ करायचा. सुमापासून त्याला दोन मुले आहेत. सुमाच्या आईने सुमाची सुटका होण्यासाठी अनेकदा स्थानिक नेत्यांशी संपर्क करून मदतीची मागणी केल्यावर देखील कोणाला ही आरोपीने प्रतिसाद दिला नाही.त्याने सुमाचा छळ सुरूच ठेवला. तिला मारहाण करायचा. सुमाच्या अवस्थेची माहिती मिळाल्यावर तिच्या एका नातेवाईकाने पोलिसांत तक्रार केली नंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा घरावर छापा टाकत सुमाची सुटका केली आणि आरोपी सन्नालैया ला अटक केली.
Edited by - Priya Dixit