गलवान व्हॅलीमध्ये भारतीय लष्कराने फडकवला तिरंगा
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराने नवीन वर्षाच्या निमित्ताने सीमेवर तिरंगा फडकवला आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवानांनी तिरंगा फडकवला. भारतीय सैन्याने तिरंगा फडकवल्याची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा मीडियाच्या एका भागात चीनने गलवान खोऱ्यात ध्वज फडकवल्याच्या बातम्या येत होत्या. यापूर्वी असेही वृत्त आले होते की, चीनने अरुणाचल प्रदेशातील काही भागांना नवीन नावे दिली आहेत. विवादित जमीन सीमा कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी चीनने हे पाऊल उचलले.
या वृत्तांना उत्तर देताना, गुरुवारी केंद्र सरकारने म्हटले होते की, 'आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे अरुणाचलच्या काही भागांचे चीनकडून नामांतर केल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत. पण नाव बदलल्याने वास्तव बदलत नाही. अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता आणि पुढेही राहील.